Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: तिघांना भरधाव ट्रकने जोराची धडक, भीषण अपघातात एक ठार दोघे...

अहमदनगर ब्रेकिंग: तिघांना भरधाव ट्रकने जोराची धडक, भीषण अपघातात एक ठार दोघे जखमी

Breaking News | Ahmednagar:  रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात.

Three people were hit by a speeding truck, one was killed in a terrible accident

श्रीगोंदा : रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे शनिवारी (दि.१३) रोजी सकाळी घडली. या भीषण धडकेत अभिषेक बबन मोरे (वय २२ वर्षे रा.तनपुरेवाडी ता. पाथर्डी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

तर केशरबाई नाना जाधव (रा.शिरसगाव काटा ता. शिरुर), शहाजी दामोधर बरबडे (रा. राशीन ता. कर्जत) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या बाबत महेश बबन बुचकुल (वय २४ रा.तनपुरवाडी ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक वीरसिंग आनंथराम सिंग (रा. सिती जम्मु आणि काश्मीर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी तसेच मयत आणि जखमी सर्वजण काष्टी येथे शनिवारी जनावरांचा बाजार असल्याने आले होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना नगर दौंड रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक (क्र.एन.एल ०१ ए.बी.६२८६) ने मातोश्री ग्रामीण रुग्णालयाजवळ तिघांना जोराची धडक दिली.

या भीषण धडकेत अभिषेक बबन मोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर केशरबाई नाना जाधव, शहाजी दामोधर बरबडे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Three people were hit by a speeding truck, one was killed in a terrible accident

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here