Home बुलढाणा Accident | टिप्पर आणि दुचाकीत अपघात, तिघांचा मृत्यू

Accident | टिप्पर आणि दुचाकीत अपघात, तिघांचा मृत्यू

Three killed in tipper and two-wheeler accident

Buldhana | बुलढाणा: बुलढाणा अजिंठा महामार्गावर मढ फाट्याजवळ टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात (Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गवरील मढ फाट्याजवळ असलेल्या महानुभाव आश्रम समोर आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवर असलेल्या ४ जणांपैकी पती, पत्नी, मुलगा व त्यांचा एक नातेवाईक मुलगा हे मढकडून औरंगाबाद जिल्ह्यातील पानवडोद या गावाकडे जात होते. यावेळी त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला.

या धडकेत दुचाकीवरील ४० वर्षीय व्यक्ती जागीच ठार (Death) झाला, तर २ मुलं, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी (injured) झाली. मुलांसह महिलेला रुग्णालयाच दाखल केले, पण डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मयत घोषित केले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Three killed in tipper and two-wheeler accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here