Accident: भाविकांच्या गाडीला अपघात, तीन ठार, सात जखमी
Ahmednagar | कर्जत | Karjat: तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेला भरणार्या यात्रेत काठी घेऊन जाणार्या कर्जत तालुक्यातील नागापूर येथील भाविकांच्या वाहनाला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) झाला. या अपघातात तीन ठार तर 7 जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे झाला.
मंगल संपत निंभोरे (वय 60), त्यांची विवाहित मुलगी मनीषा शिंगवे (वय 28) व सचिन भाऊसाहेब काळे (वय 30, रा. सर्व नागापूर, ता. कर्जत) अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत.
भाऊसाहेब निंभोरे, अतुल निंभोरे, अनिल निंभोरे, प्रीती निंभोरे या लहान मुलीसह अन्य तीन जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागापूर येथील ग्रामस्थांच्या काठीला तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेला भरणार्या यात्रेमध्ये मान आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने नागापूर येथील ग्रामस्थ तुळजापूर येथे जात असतात. शुक्रवारी रात्री मानाची काठी घेऊन नागापूर येथील भाविक वेगवेगळ्या वाहनांमधून तुळजापूर निघाले.
शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तुळजापूरजवळील येरमाळा या गावाजवळ उड्डाणपुलानजिक भाविकांच्या पिकअप वाहनाला पाठीमागून भरधाव आलेल्या गाडीने धडक दिली. धडक देणारे वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे. जखमींना सोलापूर येथे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना नातेवाईकांनी नगर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे नागापूर गावावर शोककळा पसरली.
Web Title: Three killed, seven injured in road accident