Home अहमदनगर Molested: पोलीस मित्राने केला महिलेचा विनयभंग

Molested: पोलीस मित्राने केला महिलेचा विनयभंग

Police friend molested a woman

Ahmednagar | राहुरी | Rahuri: राहुरी येथील एका आलम शेख नावाच्या पोलीस मित्राने एका महिलेच्या घरात घुसून तिच्याकडून पैसे मागताना तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत विनयभंग (Molested) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात या पोलीस मित्रावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी शहर परिसरात एक 35 वर्षीय महिला तिच्या दोन लहान मुलांसह राहते. दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान आरोपी आलम रफिक शेख हा जबरदस्तीने त्या महिलेच्या घरात घुसला. त्या महिलेला म्हणाला, मागील महिन्यात माझे वडील रफिक शेख यांच्याकडून घरखर्चासाठी घेतलेले 10 हजार रुपये परत देऊन टाक. त्यावेळी त्या महिलेने नकार दिला.  त्याचाच राग आल्याने आलम शेख याने त्या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला पाहून घेतो. तुला खल्लास करून टाकीन. अशी धमकी दिली. यावेळी त्या महिलेने आरडाओरडा केला असता तिच्या शेजारील एक महिला धावत आली. त्यावेळी आलम शेख तेथून पसार झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे.

महिलेच्या  फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी आलम रफिक शेख रा. राहुरी खुर्द ता. राहुरी याच्या विरोधात विनयभंग व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी आलम शेख याला ताबडतोब अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार शिवाजी खरात हे करीत आहेत.

Web Title: Police friend molested a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here