Home अहमदनगर Dead Bodies: प्रवरा नदीत आढळले दोन तरुणांचे मृतदेह

Dead Bodies: प्रवरा नदीत आढळले दोन तरुणांचे मृतदेह

Dead bodies of two youths were found in Pravara river

Ahmednagar | Newasa | नेवासा: नेवासा तालुक्यातील खुपटी येथील प्रवरा नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन तरुणांचे मृतदेह (Dead Bodies) शनिवारी सकाळी आढळून आले. दोन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

प्रवीण पावलस ठुबे वय ३० व दीपक प्रक्षा घोरपडे वय ३० दोघे रा. खुपटी ता. नेवासा अशी दोघा मृतांची नावे आहेत.

याबाबत अमोल पावलस  ठुबे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ठुबे यांनी शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास खुपटी येथील सायकल दुकान उघडले. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांकडून समजले की, प्रवरा नदी पात्रात महादेव मंदिराजवळ दोन मृतदेह पाण्यावर तरंगत आहेत. तेथे जाऊन दोनही मृतदेह बाहेर काढून पाहिले असता  प्रवीण पावलस ठुबे वय ३० व दीपक प्रक्षा घोरपडे वय ३० हे दोघे असल्याचे आढळून आले. त्यानंतर अमोल ठुबे यांनी त्यांची भावजयी अश्विनी हिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले की, हे दोघे प्रवरा नदीवर पोहायला गेले असे सांगितले होते. प्रवीण हा नेहमी दोन चार दिवस कामानिमित्त बाहेर जात असतो. त्यामुळे ते घरी आले नाही तरी कोणतीही तक्रार केली नाही असे अश्विनी ठुबे यांनी सांगितले आहे.  

Web Title: Dead bodies of two youths were found in Pravara river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here