Ahmednagar | अहमदनगर: लग्न करण्यासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. नगर शहरातील चितळेरोड येथे ही घटना घडली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
सिद्धी शरद मुनगेल वय १६ असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीची आई शोभा शरद मुनगेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंद्रजीत राजू माणकेश्वर वय १९ रा. श्रीगणेश कॉलनी आलमगीर असे आरोपीचे नाव आहे. मयत सिद्धी अकरावीत शिक्षण घेत होती. तसेच पार्टटाईम एका एजन्सीमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. शुक्रवारी दुपारी सिद्धीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविचेदनासाठी शव जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे आरोपी इंद्रजीत माणकेश्वर मृतदेहाजवळ जाऊन बोलत होता. मयत सिद्धीच्या कुटुंबीयांनी हे पाहिले. त्यानंतर माणकेश्वर याचा मोबाईल तपासाला असता त्यात तिला मेसेज केल्याचे आढळले. लग्नासाठी आरोपी इंद्रजीत माणकेश्वर याने तगादा लावल्याने सिद्धीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पोलीस उप निरीक्षक मनोज कचरे अधिक तपास करीत आहे.
Web Title: Young man begs for marriage, commits suicide by hanging young woman