Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर ट्रकला भीषण आग “द बर्न ट्रक”

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर ट्रकला भीषण आग “द बर्न ट्रक”

Sangamner Truck catches fire on Nashik-Pune highway

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावा अंतर्गत येणाऱ्या १९ मैल परीसरात मालवाहू ट्रकचा अपघात (Accident) होऊन ट्रकला आग (fire) लागून ट्रक भस्मसात झाल्याची घटना रविवारी दि. १७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडली. संगमनेर साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबांना पाचारण केले मात्र ट्रक जळून खाक झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालवाहू ट्रक (क्रमांक एम पी ०९ एच जी ०११२) ही पुण्याकडून नाशिकच्या दिशेने चालली होती ती रवीवारी पहाटे खंदरमाळवाडी गावा अंतर्गत असणार्या १९ मैल परीसरातील हॉटेल बिकानेर जवळ आली असता समोरुन चाललेल्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रक पाठीमागून जोरदार धडकली  कंटेनर चालक कंटेनर घेऊन पळून गेला व या अपघातात ट्रकचे पुढील बाजूने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात ट्रकने पेट घेतला व काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. अशी माहिती चालकाने दिली.

तर हा ट्रक सकाळी नऊ वाजेपर्यंत पेटत होता ही माहिती डोळासणे महामार्ग पोलिसांना समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल साळवे, मनेश शिंदे, उमेश गव्हाने घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे, नामदेव बिरे, माळी आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन संगमनेर महानगर पालिका व साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबांना पाचारण केले व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु ही आग विझवूनही सकाळी नऊ वाजेपर्यंत  ट्रकचे टायर जळतानाचे चित्र दिसत होते .

Web Title: Sangamner Truck catches fire on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here