Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावातील जुन्या चौकात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तळेगाव दिघे गावातील शनि मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्याकडेला जुन्या चौकात पाण्याच्या हात पंपाशेजारी एका अंदाजे 40 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नजीकच्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर मृतदेहाचे अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: finding Dead body in Sangamner taluka