Home महाराष्ट्र हवामान खात्याचा इशारा: हे तीन दिवस उष्णतेची लाट, पावसाची शक्यता

हवामान खात्याचा इशारा: हे तीन दिवस उष्णतेची लाट, पावसाची शक्यता

three days heat wave, chance of rain

मुंबई: विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

राज्यभरात तापमानवाढीचा अंदाज आहे. विदर्भात 18 ते 20 एप्रिलदरम्यान, उष्णेची लाट येणार आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर पावसाची शक्यता आहे. शनिवारी चंद्रपुरात राज्यातलं सर्वाधिक म्हणजेच 44 अंश तापमान होते. तर त्याच काळात म्हणजे 19 एप्रिलनंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वर्धा, अकोला, नागपूरमधलं तापमान 42 ते 43 अंशांवर आहे. मराठवाड्यात 42 अंश, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापुरात ते 40 ते 41 अंशांवर आहे.

तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याने विदर्भात 18 ते 20 एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही कमाल तापमानाचा पारा सध्याच्या तुलनेत काहीसा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दक्षिणेकडील काही राज्यांत पावसाची स्थिती असल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी भागांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Web Title: three days heat wave, chance of rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here