Home अहमदनगर Ahmednagar: परदेशातून जिल्ह्यात आलेले तिघे जण निगेटिव्ह

Ahmednagar: परदेशातून जिल्ह्यात आलेले तिघे जण निगेटिव्ह

Three people who came to the Ahmednagar from abroad are negative

Ahmednagar | राहुरी: राज्यात सध्या नवीन व्हायरस ओमीक्रोनचा बोलबाला सुरु आहे. काही ठिकाणी संशियत रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात तीन नागरिक परदेशातून आले आणि प्रशासनाची धांदल उडाली मात्र हे तिघेही निगेटिव्ह आल्याचे समजताच यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

ब्रिटनमधुन एक दाम्पत्य आणि जर्मनीहून एक युवक राहुरीत आल्याचे संबंधित यंत्रणान वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आल्यानंतर प्रशासनाची धांदल उडाली. सोशियल मेडीयावर याबाबत पोस्ट व्हायरल होत होत्या. मात्र प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळत असल्याचे सर्वांच्या लक्षात येत होते.

ब्रिटनमधून एक दाम्पत्य राहुरी दाखल झाले. राहुरी आल्यानंतर ते दाम्पत्य राजस्थानमध्ये गेले. तेथे कोरोना चाचणी केल्यावर अहवाल निगेटिव्ह आढळून आला आहे. जर्मनीहून राहुरीत एक युवक दाखल झाला. तो येण्यापुर्वीच कोरोना चाचणी घेऊन निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. तरीही या युवकाची पुन्हा कोरोना चाचणी घेण्याची सूचना संबंधित विभागाने दिली आहे.

Web Title: Three people who came to the Ahmednagar from abroad are negative

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here