Home Accident News राहता येथे मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस पलटी

राहता येथे मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस पलटी

Accident Madhya Pradesh Transport Corporation bus overturned at Rahata

राहाता | Accident:  राहाता तालुक्यात मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या पुणे इंदोर प्रवाशी बसचा राॅड तुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. काल साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने बसमधील सर्व जण सुखरूप आहेत.

मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची पुणे-इंदोर बस पुण्यावरून इंदोरला जाण्यासाठी चार वाजता निघाली होती. नगर मनमाड महामार्गावर राहाता येथील न्यायालय जवळ आली असता साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास गाडीचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा व नियंत्रण सुटले होते.

परंतु कसेबसे प्रसंगावधान राखत चालकाने गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. गाडी रस्त्याच्या कडेला एकाबाजूने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. बस एका बाजूला कानडी होऊन पडली व जागेवरच स्थिरवल्याने मोठा अनर्थ टळला व चालक-वाहक याचेसह सर्व प्रवाशांचे जीव वाचले.

अपघातस्थळा जवळ असलेल्या तांबे वस्तीवरील तरुणांनी मदतीसाठी मोठी धावपळ केली. मदत कार्यात धावून जात या तरुणांनी तातडीने बस मधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले. 108 ॲबुलन्स वरील चालक ज्ञानेश्वर थोरात यांनी तातडीने औषधोपचारांची गरज असणाऱ्या प्रवाशांना राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी पोलीस हवालदार दिलीप तुपे, सतीश आवारे शेषराव, अनारसे आधी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेऊन मद्तकार्य केले.

Web Title: Accident Madhya Pradesh Transport Corporation bus overturned at Rahata

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here