Home क्राईम धनादेश न वटल्याने  संगमनेरातील एकास एक वर्ष कैदेची शिक्षा

धनादेश न वटल्याने  संगमनेरातील एकास एक वर्ष कैदेची शिक्षा

Crime News One man sentenced to one year imprisonment in Sangamner  

संगमनेर | Crime News: कर्जापोटी पतसंस्थेस दिलेला धनादेश ना वटल्यामुळे आणि धनादेशाची रक्कम पतसंस्थेला परत न करणाऱ्या समीर सुलेमान सय्यद याला संगमनेरच्या न्यायालयाने १ वर्ष कैद व धनादेशाची रक्कम ना भरल्यास आणखी तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील जयकिसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस आरोपीने सदरचा धनादेश दिला होता.

समीर सय्यद याने घारगाव येथील जयकिसान ग्रामीण पतसंस्थेकडून तीन लाख रुपयांचे फिक्स लोन घेतले होते.संस्थेने दिलेल्या या कर्जाचा आरोपीने त्याच्या कामासाठी उपयोग केला. सुरुवातीला काही रक्कम आरोपीने संस्थेत भरली. मात्र नंतर त्याने पैसे ना भरल्यामुळे त्याचे कर्ज अनियमित झाल्याने संस्थेने त्याच्याकडे थकीत कर्जाच्या रकमेची मागणी केली. त्यावेळी सय्यद याने त्याचे खाते असललेल्या स्टेट बँक घारगाव शाखेतील १ लाख ३ हजार ६ रुपयांचा धनादेश पतसंस्थेला दिला. मात्र सदरचा धनादेश खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे ना वटता परत गेला. त्यावेळी संस्थेने कायदेशीर नोटीस देत सय्यद याच्याकडे चेकच्या रकमेची मागणी केली असता रक्कम दिली नाही. फिर्यादी संस्थेची फसवणूक केल्याच्या कारणावर संगमनेर येथील न्यायालयात आरोपी समीर सय्यद याच्याविरोधात फिर्यादी संस्थेची व ना वटणारा धनादेश दिल्याने  गुन्ह्याची नोंद २०१७ मध्ये केली होती. शनिवारी न्यायालयाने  आरोपीस दोषी धरत शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: Crime News One man sentenced to one year imprisonment in Sangamner  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here