Home Accident News Accident: तीन वाहनांचा अपघात, चार जण जखमी

Accident: तीन वाहनांचा अपघात, चार जण जखमी

Three vehicles Accident four injured

पारनेर | Accident: नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून समोरच्या वाहनाला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सचिन बोरुदिया यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,  पुणे महामार्गावर ते गाडी एमएच 14 ईयु 0709 या ईको गाडीला नारायणगव्हाण शिवारातील नवले मळा येथे समोरून पुण्याच्या दिशेने जात असलेला सीजी 04 एमएच 2915 या क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून दुसर्‍या बाजुच्या गाडीला जोराची धडक दिली.

तर त्याचवेळी पुण्याहून नगरच्या दिशेने जात असलेल्या हिगोंली डेपोची बस क्रमांक एमएच 20 बीएल 2851या गाडीवरही तो मालट्रक धडकला. अशा तिहेरी अपघातात तीन गाड्याचे नुकसान झाले आहे. आणि यात इको गाडी पलटी होऊन गाडीत असलेल्या ललिता माणिकचंद बोरुदिया, सुप्रिया सचिन बोरुदिया, राज सचिन बोरुदिया व तनिष बोरुदिया हे चौघे जखमी झाले.

सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून अपघातातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Three vehicles Accident four injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here