Home अहमदनगर किरकोळ कारणातून तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

किरकोळ कारणातून तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

Kopargaon Three were beaten for minor reasons

कोपरगाव: किरकोळ वादातून चार जणांनी तिघा जणांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना मढी बुद्रुक येथे घडली आहे.

शेतातील गव्हाच्या पेंढ्या का घेऊन चाललात असे विचारालेच्या रागातून चार जणांनी मिळून तिघा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे घडली. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

दगडू विठ्ठल गवळी, प्रवीण दगडू गवळी, सचिन दगडू गवळी हे तिघे जण मारहाणीत जखमी झाले आहेत.

याप्रकरणी दगडू विठ्ठल गवळी रा. मढी बुद्रुक ता. कोपरगाव यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे यावरून पोलिसांनी बाळू विठ्ठल गवळी, गणेश बाळू गवळी, निलेश बाळू गवळी, बापू बाळू गवळी सर्वरा. मढी बुद्रुक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोपरगाव पोलीस करीत आहे.

ओम प्रॉडक्शन आपल्याकरिता कोरोना जनजागृती एक नवीन  उर्जा देणारे गीत: खालील युट्युब लिंकवर क्लिक करून पहा: कोरोना गीत

PLEASE LIKE — SUBSCRIBE —– SHARE

Web Title: Kopargaon Three were beaten for minor reasons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here