Home अकोले अकोले ब्रेकिंग! विजेच्या तारांना तीन तरुण चिटकले

अकोले ब्रेकिंग! विजेच्या तारांना तीन तरुण चिटकले

Breaking News | Akole: वीजवाहक तारांना तीन आदिवासी तरुण चिटकून होरपळल्याची घटना.

Three youths hit the electric wires

 

अकोले: अकोले तालुक्यातील धुमाळवाडी शिवारात असलेल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावर वीजवाहक तारांना तीन आदिवासी तरुण चिटकून होरपळल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र एक तरुण सत्तर टक्के भाजला तर दोघे कमी प्रमाणात भाजले आहे. 

अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावातील दत्तू गावंडे, नितीन मधे, रोशन मधे हे आदिवासी तरुण विजेच्या प्रवाहात होरपळले आहे. हे मुरगास बनविण्यासाठी आले होते. धुमाळवाडी शिवारात उजव्या कालव्याच्या शिवारात ट्रक्टरवरून जात असताना या पुलावरून गेलेल्या तारांचा ट्रक्टरला स्पर्श झाला आणि विद्युतप्रवाह ट्रक्टरला उतरला यावेळी तरुणांनी मोठा आक्रोश केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी तातडीने अकोले येथील रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे महावितरणचा आणखी एक गलथान प्रकार समोर आला आहे.

Web Title: Three youths hit the electric wires

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here