Home क्राईम आठ दिवसांवर साखरपुडा असताना तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, धक्कादायक कारण आले समोर

आठ दिवसांवर साखरपुडा असताना तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, धक्कादायक कारण आले समोर

Beed Crime News:  तरुणाच्या धमक्यांना कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Tired of threats from a young man, a young woman committed suicide

बीड: जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली असून, तरुणाच्या धमक्यांना कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आठ दिवसांवर साखरपुडा आला असताना या तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मनीषा परमेश्वर घुले (वय 19 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर वैभव रामराज मुंडे असे धमक्या देणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की,  बीडच्या वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील 19 वर्षीय मनीषा घुले नावाच्या तरुणीने गावातीलच तरुणाच्या धमक्यांना कंटाळून राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. तर मनीषाचं 23 तारखेला साखरपुडा आणि लग्न 28 जुलै रोजी होणार होते. परंतु, गावातील तरुण वैभव  मुंडे हा मनीषाला ‘माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करेन’ अशा धमक्या लग्न जमल्यापासून देत होता. अखेर त्याच्या धमक्यांना कंटाळून मनीषाने आत्महत्या केली.

आई-वडील शेतात गेल्यावर मनीषाने सकाळी 11 वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा आतमधून बंद करुन घेतला. त्यानंतर घरातील फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसट यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चिंचवण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी मुलीचे वडील परमेश्वर बजरंग घुले यांच्या तक्रारीवरुन वैभव मुंडे याच्यावर शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी वैभव मुंडे फरार झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

मयत मनीषाचे परळी तालुक्यातील रेवलीवाका सिरसळा येथील तरुणासोबत लग्न जमले होते. तर 23 जुलैला साखरपुडा आणि 28 जुलै रोजी लग्न होणार होते. त्यामुळे घरात लग्न कार्याची तयारी सुरु होती.

Web Title: Tired of threats from a young man, a young woman committed suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here