Home पुणे माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक, इन्होवा गाडी थेट ३०...

माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक, इन्होवा गाडी थेट ३० फूट ओढ्यात

कल्याण – अहमदनगर महार्गावर इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात (Accident) झाल्याची घटना. इन्होवा कार थेट शेजारी वाहत असणाऱ्या ३० फूट ओढ्यात जाऊन पडली.

Inhowa and Nano car collided head on in Malshej Ghat Accident

पुणे : ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या माळशेज घाटाच्या सुरुवातीला असणाऱ्या फांगुळगव्हाण या गावच्या हद्दीत गाव परिसरात कल्याण – अहमदनगर महार्गावर इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तर इन्होवा गाडी थेट शेजारी वाहत असणाऱ्या ३० फूट ओढ्यात जाऊन पडली. या वाहनातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या माळशेज घाट परिसरात मुंबईच्या दिशेकडून येताना इन्होवा कार आणि नॅनो कारची समोरासमोर जोरात धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांची मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आले. मात्र इन्होवा कार घाटाच्या शेजारी वाहत असणाऱ्या ३० फूट ओढ्यात जाऊन पडली. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे घाट परिसरात एकच गर्दी झाली होती. प्रशासनाकडून माळशेज घाटात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Web Title: Inhowa and Nano car collided head on in Malshej Ghat Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here