Home Accident News ट्रॅक्टर व मोटरसायकल अपघातात, महिलेच्या अंगावरून चाक गेल्याने ठार

ट्रॅक्टर व मोटरसायकल अपघातात, महिलेच्या अंगावरून चाक गेल्याने ठार

Tractor and motorcycle accident Ladies Death

Accident | राहुरी: राहुरी-मांजरी रोडवरील रेल्वे स्टेशन गेटजवळ ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने तांदुळवाडी येथील माजी सरपंच बेबीताई सुर्यभान म्हसे (वय ५८) या मयत झाल्या आहे

याबाबत अधिक माहीती अशी की,  शनिवारी दुपारी उसाचा भरलेला ट्रॅक्टर राहुरीच्या दिशेने चालला असता तांदुळवाडी येथील माजी सरपंच बेबीताई म्हसे या आपल्या नातवासोबत मोटारसायकलवर घराकडे जात असताना रेल्वे गेटच्या वळणावर मोटारसायकलचा तोल जाऊन खाली पडले असता ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले.

त्यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. माञ डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात शोक व हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Tractor and motorcycle accident Ladies Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here