Home अकोले विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime News Akole Physical and mental abuse of a married woman

अकोले | Crime News: सासरी नांदत असताना माहेरून ५० हजार रुपये आणण्यासाठी, नेहमी आजारी असते असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करत विवाहितेची शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मोनिका सागर सोनटक्के (वय २३) ह.मु.देवठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती सागर किशोर सोनटक्के, सासु ताराबाई किशोर सोनटक्के, बाया सचिन किशोर सोनटक्के ,जाव अश्विनी सचिन सोनटक्के ,मामा सासरे राजेंद्र पंढरीनाथ कोळ, मावस सासू शांताबाई गायकवाड सर्व राहणार शिर्डी तालुका राहता पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गु र.नं.- 469/2021 भा द वि कलम 498अ 323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला

विवाहितेने फिर्यादीत म्हंटले आहे की,  दि.26/08/2019 रोजी ते 8/9/2021 रोजीचे दरम्यान सासरी नांदत असताना पती व वरील सासरच्यांनी फिर्यादीस तुला आजार आहे असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला व तू तुझ्या बापाच्या घरी निघून जा असे म्हणून तुला येथे नांदायचे असेल तर माहेरून 50 हजार रुपये घेऊन ये असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली फिर्यादीचे माहेरी लोकांनी पैसे दिले तरी फिर्यादीचे सासरची लोकांनी फिर्यादी वर संशय घेत व तिच्या मूलाचा जन्म झाले नंतर लगेच मरण पावल्याने सासरचे लोकांनी  तू काळ्यापायाची आहे असे म्हणून घरातून काढून दिले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वलवे हे करीत आहेत.

Web Title: Crime News Akole Physical and mental abuse of a married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here