Home Accident News अकोले तालुक्यात उंचखडक येथे उसाचा ट्रॅक्टर पलटी, तरुण ठार

अकोले तालुक्यात उंचखडक येथे उसाचा ट्रॅक्टर पलटी, तरुण ठार

Accident News tractor overturns at Unchakhadak in Akole taluka

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील उंचखडक येथे उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी घडला.

या अपघातात बापू प्रभू जाधव रा. मालेगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. उंचखडक येथील चढ्यावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सदर ट्रॅक्टर उसाने भरलेला असल्याने चालकास चढ्यावर ट्रॅक्टर नियंत्रित न करता आल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी भेट घेत मयत चालकाच्या कुटुंबियांना धीर दिला. यावेळी अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Accident News tractor overturns at Unchakhadak in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here