Home Accident News Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

truck and bike Accident one death

कोपरगाव | Accident: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई नागपूर राज्य मार्गावर रेल्वे पुलावर काल सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अवजड ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीस दिलेल्या धडकेत रोशन गफूर शेख वय २६ रा. कन्नड जि. औरंगाबाद या तरुणास जखमी करून पसार झाला. त्यास उपचारासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्यास मयत घोषित करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी जाफर नजीर शेख वय २८ चालक रा. खंडाळा ता. वैजापूर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, आपण आपले सहकारी मयत रोशन शेख हे दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जात असताना ट्रकने (क्रमांक – एम.एच.०४ इ.एल. ८९९१) त्यांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक देऊन त्यास गंभीर जखमी केले. त्यास रुग्णालयात दाखल केले असता मयत घोषित करण्यात आले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: truck and bike Accident one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here