Home अहमदनगर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले

भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले

Two employees of the land records office were caught red-handed taking bribe

कर्जत | Karjat: कर्जतच्या भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यरत असलेले दोन कर्मचाऱ्यांना २० हजारांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई करण्यात आली.  अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मुख्यालय सहाय्यक सुनिल झिप्रू नागरे व भूकरमापक कमलाकर वसंत पवार या दोघांवर ही कारवाई  करण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील  आंबिजळगाव येथील तक्रारदार यांची पत्नी व इतर दोघांच्या जमिनीची भुमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली होती. मोजणीनुसार तिन्ही खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यासाठी दोघा आरोपींनी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार होती.

तडजोडी अंती 20 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार  3 मार्च 2022 रोजी भूमी अभिलेख कार्यालय, कर्जत येथे केलेल्या लाचेच्या सापळा कारवाईत सुनिल नागरे याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली. या कारवाईत दोन्ही लाचखोर कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.

Web Title: Two employees of the land records office were caught red-handed taking bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here