Home क्राईम संगमनेर: कुत्र्यामुळे दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी

संगमनेर: कुत्र्यामुळे दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी

Sangamner Crime:  कुत्र्याने शेतातील डोंगळ्याचे नुकसान केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना.

Two families fight due to dog Crime filed

संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर (Sakur) शिवारातील चितळकर वस्ती येथे कुत्र्याने शेतातील डोंगळ्याचे नुकसान केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये  मुलासह आई गंभीर जखमी झाली असून याप्रकरणी घारगाव पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर शिवारातील चितळकर वस्तीवरील राहुल शिवाजी देवकाते यांनी आपल्या शेतात कांदा बी तयार करण्यासाठी डेंगळे लावलेले आहेत. या डोंगळ्याच्या शेतामध्ये संदीप भागा देवकाते यांचे कुत्रे येऊन नुकसान करत असल्याचे राहुल देवकाते यांनी पाहिले असता त्यांनी संदीप देवकाते यांना तुमचे कुत्रे बांधून ठेवा, ते शेतात येऊन नुकसान करत आहे, असे सांगितले. याचा राग अनावर झाल्यामुळे संदीप याच्यासह अनिता संदीप देवकाते, विशाल संदीप देवकाते, चेतन संदीप देवकाते यांनी राहुल आणि त्यांची आई लता यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच संदीप व अनिता देवकाते यांनी लाकडी दांडक्याने आणि गजाने मारहाण केली तर विशाल व चेतन देवकाते यांनी दगड मारून जखमी केले.

याबाबत राहुल देवकाते यांनी घारगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संदीप भागा देवकाते, अनिता संदीप देवकाते, विशाल संदीप देवकाते, चेतन संदीप देवकाते या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Two families fight due to dog Crime filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here