Nashik: सुट्टीमध्ये पाहुण्या म्हणून आलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
नाशिक: सुरगाणा येथील हातरुंडी येथे सुट्टीमध्ये पाहुण्या म्हणून आलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत हातरुंडी गावचे पोलीस पाटील मधुकर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना गावित (वय८) रा. सुभाषनगर डोल्हारे, व रेणुका परशराम भोये (वय ६) रा. सोनगीर, ह.मु. हातरुंडी या दोन मुली सुट्टीच्या निमित्ताने हातरुंडी येथे आजोबा चिमण भोये यांच्याकडे आल्या होत्या.
काल दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास त्या दोन्ही मुली आजोबांसमवेत गावाजवळील दरी या तलावात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर जनावरांना पाणी पाजल्यावर पाण्यातून बाहेर काढत असतांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या दोन्ही मुली पाय घसरुन पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघींमधील भावना ही जिल्हा परिषद शाळा डोल्हारे येथे दुसरीच्या वर्गात शिकत होती. तर रेणुका ही सोनगीर येथे बालवाडीत होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी हातरुंडी येथे धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर राहत्या गावात शोकाकुल वातावरणात दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Two girls who came as guests during the holiday drowned in the lake
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App