Home पुणे मुलीच्या प्रियकराकडून धमकी, लग्नात अडथळा, वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

मुलीच्या प्रियकराकडून धमकी, लग्नात अडथळा, वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

Pune Crime: प्रेयसीच्या वडिलांना धमकी दिल्याने त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना, तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही, तर मी दुसरीकडे कुठेही होऊ देणार नाही, अशी धमकी या तरुणाने प्रेयसीच्या वडिलांना दिली.

committed suicide by hanging himself after threatening his girlfriend's father

पुणे: पुण्यात एका तरुणाने प्रेयसीच्या वडिलांना धमकी दिल्याने त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही, तर मी दुसरीकडे कुठेही होऊ देणार नाही, अशी धमकी या तरुणाने प्रेयसीच्या वडिलांना दिली होती. त्यानंतर वडिलांनी नैराश्याखाली येऊन गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या हडपसर येथे घडला आहे.

परमेश्वर रमेश पात्रे (वय ४०, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी मुकेश गोपाळ देढे (वय २१, रा. चंदननगर चौकीसमोर, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर परमेश्वर पात्रे यांच्या पत्नीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार जून २०२२ ते ७ मे २०२३ दरम्यान घडला आहे. फिर्यादी महिलेच्या मुलीचे मुकेश देढे याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. देढे हा काही कामधंदा करत नाही. त्यामुळे परमेश्वर पात्रे यांचा लग्नाला विरोध होता. त्यांवंतर त्यांनी मुलीचे लग्न दुसरीकडे जुळविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मुकेशला हे पटत नव्हते. परमेश्वर जिथेही मुलीच्या लग्नासाठी बोलणी करायला जायचे, तो तिथे अडळथे आणत होता. तसेच, तो त्यांना परमेश्वर पात्रे यांच्या मुलीशी लग्न करणार असल्याचं सांगायचा. इतकंच नाही तर, तुम्हाला काय करायचे ते करा, जर तुम्ही मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दिले नाही, तर मी तिचे दुसरीकडे कोठेही होऊ देणार नाही, अशी धमकीही तो वारंवार देत होता.

त्याच्या सततच्या धमक्यांमुळे कंटाळून ७ मे रोजी परमेश्वर पात्रे यांनी घरासमोरील बाथरुममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर पात्रे यांच्यावर धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पत्नीने हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस मुकेश देढेचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के अधिक तपास करीत आहेत.

Web Title: committed suicide by hanging himself after threatening his girlfriend’s father

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here