Home क्राईम नुकतच लग्न जमलं, यात्रेला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू

नुकतच लग्न जमलं, यात्रेला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू

Jalgaon Crime:  बहिणीच्या घरी यात्रेसाठी आली असता यात्रेसाठी रिक्षातून जात असताना दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटली. या अपघातात (Accident) रिक्षातील २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना.

While going on a pilgrimage, a girl died on the spot in a terrible accident

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळेनर तालुक्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बहिणीच्या घरी यात्रेसाठी आली असता यात्रेसाठी रिक्षातून जात असताना दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात रिक्षातील २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव फाट्याजवळ घडली. अश्विनी गुलाब भामरे असं मयत तरुणीचं नाव आहे. १६ एप्रिल रोजी अश्विनी हिचे लग्‍न ठरले होते. मात्र, लग्नाची तारीख अद्याप ठरली नव्हती. तत्पूर्वीच अश्विनीवर अपघाताच्या रुपाने काळाने झडप घातली. या अपघात प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी १३ एप्रिल रोजी मेहरगाव येथून अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्र.ज. येथे राहणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीसह मेव्हण्यांकडे आली होती. रात्री यात्रेत जायचं ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद या दोघांसोबत एमएच १९ बीजे ८९९६ या क्रमाकांच्या रिक्षातून अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. अश्विनीची बहिण आणि मेव्हणे हे दोघे दुचाकीवरुन रिक्षासोबत मार्गस्थ झाले.

मेहेरगाव फाट्याजवळ एमएच १९ बीजे १४०५ या क्रमाकांच्या टाटा मॅजीक या भरधाव वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, यात अश्विनीच्या डोक्याची कवटी फुटली होती. तर रिक्षातील रेखाबाई पाटील आणि वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले होते. रिक्षाच्या मागे येत असलेल्या मेव्हण्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात अश्विनी हिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डोळयासमोर लहान बहिणीचा मृत्यू बघून मोठ्या बहिणीने हंबरडा फोडला. अपघातील जखमी रेखाबाई पाटील आणि वर्षा बोरसे या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

मयत अश्विनी हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तिच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. अश्विनी हिच्या लग्नाबाबत बोलणी सुरु होती, १६ एप्रिल रोजी लग्नाची लग्न पक्के झाले होते. लग्नाची तारीख ठरणार तोच अपघाताच्या रुपाने अश्विनी हिच्यावर काळाने झडप घातली आणि लग्नापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Web Title: While going on a pilgrimage, a girl died on the spot in a terrible accident

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here