Home महाराष्ट्र Accident: भजनी मंडळाचा टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात २...

Accident: भजनी मंडळाचा टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात २ ठार, ११ जखमी

Two killed, 11 injured in car-tempo collision Accident

सांगली | Sangali : सांगलीच्या आयर्विन पुलावर रात्री टेम्पो आणि कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. भजनी मंडळाचा टेम्पो आणि वॅगणार कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर 11 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  तुंग येथील काही भजनी मंडळाच्या महिला टेम्पोमधून शिरोळकडे चालले होते. यावेळी आयर्विन पुलावर समोरून येणाऱ्या कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर टेम्पोमधील 10 व कारमधील 1 जण जखमी झाले आहेत. (Sangli Accident News)

या अपघातात सुभद्रा अर्जुन येळवीकर (वय 70), इर्शाद रफिक नदाफ (वय 33) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातातील मृत व जखमी मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व तुंग परिसरातील आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातात जखमींमध्ये सुनिल नामदेव गुरव (वय 40), यशोदा खाबिले (वय 70), अशोक शांतिनाथ मालगावे (वय 42),फुलाबाई आप्पासाहेब खामकर (वय 40), हैदर पटेल (वय 35), सविता नवळे (वय 40), रुक्मिणी शिवाजी पवार (वय 70), जनाबाई बाजीराव पाटील (70), मंगल सोपान कापसे (55, सर्व रा. तुंग) यांचा समावेश आहे.

अपघातानंतर जखमींना सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर सांगली शहर पोलीस आणी मनपा अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले. टेम्पोमधील सर्व 12 जण शिरोळला भजनी कार्यक्रमास निघाले होते. त्यावेळी या टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला.

अपघाताचे माहिती  समजताच शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालेला होता. अपघात इतका भीषण होता की मृतदेह रस्त्यावर फेकले गेले होते.

Web Title: Two killed, 11 injured in car-tempo collision Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here