Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सात महिन्याची गरोदर असल्याने उघडकीस  

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सात महिन्याची गरोदर असल्याने उघडकीस  

Sexual Abuse of a minor girl, revealed to be seven months pregnant

Ahmednagar | अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीवर गॅरेजमध्ये नेऊन वेळोवेळी अत्याचार (Sexual abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण सोपान रडे रा. आंतरवाली टेंभी ता. घनसांगवी जि. बीड असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जालना जिल्ह्यातील एका खेडेगावात राहत असलेली अल्पवयीन मुलगी एक वर्षापूर्वी तिच्या घरून गावात जात असताना आरोपीने तिला तुझ्याशी बोलायचे आहे.असे  म्हणत थांबविले. तो तिला म्हणाला की, तु मला फार आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत आरोपी पिडीत मुलीचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर आरोपी पिडीतेशी वेळोवेळी बोलू लागला. त्याने एक दिवस मुलीला त्याच्या गॅरेजवर बोलावून घेतले व आपण दोघे लग्न करू असे म्हणत बळजबरीने गॅरेजच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत नेऊन अत्याचार केला. तसेच मी तुझ्याशी लग्न करणार हे तू कुणाला सांगितलं तर तुला ठार मारीन. त्यानंतर आरोपीने वेळोवेळी अत्याचार केले. मुलीचे पोट दुखू लागल्याने तिने आईला सांगितले. पिडीतेची वैद्यकीय तपासणी केली असता ती सात महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे. पिडीत मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरोधात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sexual Abuse of a minor girl, revealed to be seven months pregnant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here