Home अहमदनगर हुंड्यापोटी विवाहितेचा बळी, पाच जणांवर गुन्हा

हुंड्यापोटी विवाहितेचा बळी, पाच जणांवर गुन्हा

Dowry victim victim, crime against five

कोपरगांव | Kopargaon:  कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथे गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, तुला भूतबाधा झाली आहे अशा असंख्य कारणावरून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. घराच्यामागे हातपाय धुण्यासाठी गेली होती ती मिळुन आली नाही. परंतु त्याच ठिकाणी असलेल्या तळ्यात तिचा मृतदेह (Dead body) आढळून आला. मुलीच्या वडिलांनी हुंड्यासाठी (Victim) बळी घेतला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझी मुलगी गायत्री महेश त्रिभूवन हिचे व तिचे सासुचे घरातील कामावरून किरकोळ वाद झाला होता. परंतु ते नेहमी माझ्या मुलीला काही ना काही कारणावरून त्रास देत होते. त्याबाबत माझ्या मुलीने मला सांगीतले होते. माझी मुलगी गायत्री हीला भुतबाधा झाली आहे. म्हणुन तिला काल शहापुर येथे मांत्रीक नामे गवळी याच्याकडे तिचे सासु सासरे घेवून गेले होते. तसेच सासरकडील मंडळी लग्न झालेपासुन आम्हाला मोटारसायकल घ्यायची आहे. त्यासाठी तुझ्या बापाकडुन हुंड्यापोटी एक लाख रुपये आण अशी मागणी मुलीला करत होते.

मात्र आज दि. 4 मे रोजी स. 7 वा. माझे मेहुणे नवनाथ हरीभाऊ राधे यांना मुलीच्या सासूने फोनवर काळविले की, तुमची मुलगी गायत्री सकाळी झाडलोट करताना दिसली त्यानंतर ती परत दिसली नाही. बेपत्ता झाली आहे असे तिने कळविले त्यानंतर मी, मेहुणा व इतर नातेवाईक असे मुलीच्या गावी देर्डे चांदवड येथे गेलो.

मुलगी घराच्यामागे हातपाय धुण्यासाठी गेली होती म्हणून आम्ही तळ्यावर जावून तिचा शोध घेतला. ती मिळुन आली नाही. म्हणून आम्ही पोलीस स्टेशन येथे येवून माझी मुलगी बेपत्ता झालेबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर आम्ही मुलीचा शोध  घेण्यासाठी मुलीचे घराचे पाठिमागे असलेल्या तळ्यात लोकांचे मदतीने पाण्यात शोध घेतला त्या तळ्याचे पाण्यात मुलगी गायत्री हिचा मृतदेह मिळुन आला. तिचे अंगावर साडी नव्हती फक्त परकर व ब्लाऊज होते. व हातात बांगड्या भरलेल्या होत्या.

याप्रकरणी बाळासाहेब पंडीतराव खरात (वय 47) (रा. पिंपळवाडी, ता. राहाता) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी पती महेश दिलीप त्रिभुवन, सासरे दिलीप पूंजा त्रिभुवन, भाया सुरेश दिलीप त्रिभुवन, सासु मिराबाई दिलीप त्रिभुवन, जाऊ मोनिका सुरेश त्रिभुवन अश्या पाच जणांविरुद्ध भादंवि कलम 498 (अ), 304 (ब), 34 प्रमाणे कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Web Title: Dowry victim victim, crime against five

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here