Home महाराष्ट्र Murder: चार महिन्यापुर्वी विवाह झाला, पतीने चारित्र्याच्या संशयावरुन गळ्यावर चाकूने वार करीत...

Murder: चार महिन्यापुर्वी विवाह झाला, पतीने चारित्र्याच्या संशयावरुन गळ्यावर चाकूने वार करीत पत्नीची हत्या

Husband stabs wife murder in the neck on suspicion of adultery

हिंगोली | Hingoli : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने लग्न झाल्यानंतर, चारच महिन्यात आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करत तिची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना हिंगोलीच्या वसमत तालुक्यात घडली आहे. अलका विश्वनाथ पोटे वय वर्ष २१ असं मयत पत्नीचे नावं आहे. तर विश्वनाथ पोटे वय वर्ष २३ असं आरोपी पतीचे नाव आहे.

अलका आणि विश्वनाथ यांचा चार महिन्यांपुर्वी विवाह झाला होता. ह हे दोघे पती-पत्नी शेतातील हळद काढणीच्या कामाला वसमत तालुक्यातील सारोळा गावच्या शेत शिवारामध्ये गेले होते. मागील दोन दिवसांपासून या दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन वाद सुरु होते. अशातच आज संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या विश्वनाथ याने आपल्याच पत्नीवर हल्ला करत तिच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करुन निर्घुण हत्या केली.

या घटनेनंतर आरोपी पती विश्वनाथ पोटे फरार झाला आहे. या प्रकरणात वसमत ग्रामीण पोलिसांनी मयत विवाहीत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.

Web Title: Husband stabs wife murder in the neck on suspicion of adultery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here