Accident | अहमदनगर: ट्रकने धडक दिल्याने अपघात, दोघे जागीच ठार
Ahmednagar News | कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील नगर मनमाड महामार्गांवर रस्ता ओलांडताना अण्णासाहेब भिमाजी लबडे ( वय 58 ) व त्यांचा सहकारी दत्तात्रय नाना पवार ( वय 57 ) यांना अज्ञात ट्रकने धडक दिल्याने अपघातात (Accident) दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री 10.54 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कोपरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरूध् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रदीप अंबादास पवार रा. टाकळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आण्णासाहेब लबडे व त्यांचा सहकारी दत्तात्रय पवार हे दोघे काही कामानिमित्त भेटण्यास आले होते. रविवारी रात्री 10.54 वाजेच्या सुमारास ते फिरण्यासाठी म्हणून गेले असता त्यांना रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली असून त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यातील एक जण जागीच ठार झाला होता. तर एकास तातडीने उपचारार्थ लोणी येथील रुग्णालायत दाखल केले असता त्यास तेथील उपचार करणार्या वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.
Web Title: Two killed on the spot after being hit by a truck Accident