Home अहमदनगर अहमदनगर: आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर: आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

young man who went for a bath drowned

Ahmednagar News | नेवासा | Newasa:  मित्रांबरोबर गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील सुरेगावगंगा येथे घडली. श्रीकांत गणेश शिंदे (वय 19) हा युवक मयत झाला आहे. बारामती येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण सुरू होते. सुरेगावगंगा येथील माजी सरपंच नरसिंगराव शिंदे यांचा तो नातू होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेगावगंगा येथील श्रीकांत गणेश शिंदे (वय 19) हा युवक सकाळी 8 वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी मित्रांसमवेत गेला होता. पोहत असताना नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला.

सदर घटनेची खबर अंकुश ज्ञानदेव शिंदे यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, हवालदार बबन तमनर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा हे घटनास्थळी हजर झाले.

त्यानंतर परिसरातील युवकांनी बराच वेळ नदीपात्रात शोध घेतला असता सदर युवकाचा शोध लागला नाही. त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनने शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील गोताखोर पथकास पाचारण केले असता त्यांनी ऑक्सीजन सिलेंडर च्या साह्याने नदीपात्राच्या तळाशी शोध घेतला असता या युवकाचा मृतदेह या पथकाला रविवारी सायंकाळी मिळून आला. अधिक तपास हवालदार बबन तमनर हे करत आहेत.

Web Title: young man who went for a bath drowned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here