Home नांदेड Murder | शहरात एकाच दिवसात दोन खुनांच्या घटनेमुळे खळबळ

Murder | शहरात एकाच दिवसात दोन खुनांच्या घटनेमुळे खळबळ

Two murder in one day in Nanded

नांदेड | Nanded : नांदेड शहरात एकाच दिवसात दोन खुनांच्या (Murder) घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  तर दुसरीकडे पोलिसांसमोर बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या कार्यालयासमोर दोन गुंडांनी राडा केल्यानंतरही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नांदेडकरांनी संताप व्यक्त केलाय. एकीकडे जुन्या नांदेड शहरात एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आला तर दुसरीकडे मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूने वार करून हत्या करण्यात आली  गेल्या 24 तासात या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत अमोल साबणे मयत तरुणाचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेतील मयत संपादकाचे नाव प्रेमानंद जोंधळे असे आहे. यात अमोल हा शुक्रवारी सकाळी शौचास पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात गेला आणि तो परतलाच नाही, रात्र झाली तरी तो घरी परत नसल्याने मित्र आणि कुटूंबियांनी शोध घेतला असता अमोलचा मृतदेह झुडपात आढळून आला. अज्ञात मारेकऱ्यांनी अमोलवर धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भाऊ श्याम साबणे याने दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत संपादक प्रेमानंद जोंधळे हे सोमेश कॉलनी येथील त्यांच्या घरून निघाले असता त्यांच्या घरा नजीक मिलगेट परिसरात त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या अल्पवयीन आरोपीने धारदार शस्त्राने  त्यांच्यावर सपासप वार करून निघृण हत्या केली आहे.  दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये इतवारा पोलीस ठाणे व वाजीराबाद पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Two murder in one day in Nanded

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here