Home अकोला म्हशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकींना वाचविताना तिघीही बुडाल्या

म्हशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकींना वाचविताना तिघीही बुडाल्या

three drowned while rescuing each other while pulling the buffalo out of the water

Akola | अकोला: अकोल्यातील  बार्शी टाकळी तालुक्यातल्या दगडपारवा धरणात बुडून (Drowned) माय मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून आज सोमवारी सकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या हाती तिघांचे मृतदेह लागले आहेत.

सरिता सुरेश घोगरे, वैशाली सुरेश घोगरे आणि अंजली सुरेश घोगरे या तिघींचा बुडून मृत्यू झालेला आहे. या तिघी म्हशी शोधण्यासाठी गेल्या होत्या. म्हशीला पाण्यातून बाहेर काढताना एकमेकीला वाचवताना तिघीही बुडाल्या. या घटनेमुळे दगडपारवा गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. शोध घेतल्यानंतर तिघांचाही काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे रविवारी सायंकाळी उशिरा शाेध माेहिम थांबविण्यात आली. आज (साेमवार) पुन्हा सकाळच्या सुमारास शोध मोहीम सुरु केली. ग्रामस्थांनी तिघींचे मृतेदह आज शोधून पाण्याच्या बाहेर काढले. त्यावेळी उपस्थितांमधील काही जणांनी एकच हंबरडा फोडला आहे.

Web Title: three drowned while rescuing each other while pulling the buffalo out of the water

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here