Home अहमदनगर Accident: गिर्यारोहण करताना डोंगरावरून पडून नगरच्या दोघांचा मृत्यू

Accident: गिर्यारोहण करताना डोंगरावरून पडून नगरच्या दोघांचा मृत्यू

Two of theAhmednagar died after falling from a mountain while hiking

Accident | Ahmednagar | मनमाड:  गिर्यारोहण करीत असताना १५ जणांच्या टीममधील दोन जणांचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना कातरवाडी भागात शेंडीच्या डोंगरावर घडली.  या अपघातात अमोल वाघ आणि मयूर म्हस्के (रा. अहमदनगर) या दोन या तरुणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

अहमदनगर (Ahmednagar) येथील इंद्रप्रस्थ गिर्यारोहक ग्रुपच्या 15 जणांची एक टीम मनमाडपासून जवळ असलेल्या कातरवाडी भागातील शेंडीच्या डोंगरावर गिर्यारोहण करण्यासाठी गेली होती. यामध्ये 8 मुली आणि 7 मुलांचा समावेश होता. हे सर्वजण डोंगरावर गेले होते. सुरुवातीला गिर्यारोहक अमोल वाघ आणि मयूर म्हस्के हे खिळे ठोकत दोर बांधून डोंगराच्या शेंडीवर गेले. त्यानंतर इतर 13 जण वरती चढले होते. सायंकाळी 13 जण खाली उतरले. शेवटी गिर्यारोहक अमोल वाघ आणि मयूर म्हस्के खाली येत असताना एक खिळा निखळल्यामुळे दोर सटकून दोघे जण खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण घाबरले होते.

दोघे शेंडीवरून पडल्याचे पाहून त्यांच्या सोबत असलेल्यांनी आक्रोश आणि आरडाओरडा केला मात्र डोंगराची उंची जास्त असल्यामुळे खाली गावात त्यांचा आवाज पोहचू शकत नव्हता  मात्र त्यांचे हातवारे पाहून काही तरी वेगळं घडल्याची जाणीव ग्रामस्थांना झाली आणि संघरत्न संसारे, तुषार बिडगर, अमोल झाल्टे, प्रवीण संसारे, राजेंद्र गांगुर्डे, संतोष झाल्टे, तेजस ढोणे, कल्पेश सरोदे, दत्तात्रय झाल्टे, ऋषी गुंजाळ, किरण झाल्टे, विजय संसारे आदी तरुणांनी डोंगरावर जाऊन दोघांचे मृतदेह खाली आणले. कातरवाडीच्या ग्रामस्थांनी धीर देत सर्वांना गावातील मंदिरात आणले. दोघांचे मृतदेह मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले होते.

Web Title: Two of theAhmednagar died after falling from a mountain while hiking

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here