Home पुणे Accident: पुणे नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू

Accident: पुणे नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू

Accident:  झाड दुचाकीवर पडल्यानंतर दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली, दोघांचा मृत्यू.

Two people died after a tree fell on a speeding bike Accident

पिंपरी चिंचवड:   पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळून भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोसरीमधून नाशिक फाट्याकडे जात असताना दुचाकीवरील दोघांवर काळाने ने झडप घातली.

समाधान नथू पाटील (वय- ३६), निलेश राजेश शिंगाळे (वय-३७) असे या अपघातामधील मृतांची नावे आहेत.

सदर घटना आज शनिवार सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. रस्त्यावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी पोहचत झाड बाजूला केलं असून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीवर झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. भोसरी वरून नाशिक फाट्याकडे जात असताना भोसरी पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली आहे. दुचाकीवरील दोघांनी हेल्मेट घातले होते. परंतू, झाड थेट डोक्यात पडल्याने गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला. झाड दुचाकीवर पडल्यानंतर दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली होती.

Web Title: Two people died after a tree fell on a speeding bike Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here