Home Accident News अकोले: कार-दुचाकी अपघातात दोन जण ठार, हळदीच्या कार्यक्रमासाठी पोहोचण्यापूर्वीच…

अकोले: कार-दुचाकी अपघातात दोन जण ठार, हळदीच्या कार्यक्रमासाठी पोहोचण्यापूर्वीच…

Akole News: ब्राह्मणवाडा- ओतूर रस्त्यावर दुचाकी कारवर आदळून भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना, या अपघातात दोन जण ठार.

Two people were killed in a car-bicycle accident

कोतूळ: अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा- ओतूर रस्त्यावर दुचाकी कारवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या अपघातात दोन जण ठार झाले. यामध्ये तिसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी पोहोचण्यापूर्वीच दोघांवर काळाने घाला घातला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संजय रखमा भांगरे (रा. कौटवाडी), धनराज सुनील भांगरे (रा. कोहणे), कृष्णा गोडे (रा. केळी कोतूळ गोडेवाडी) हे तिघे तरुण सोमवारी पुण्यातील चाकण येथून अकोले तालुक्यातील मूळगावी येत होते. हे तिघे दुचाकीवरून (एम. एच. १७, बीई ९३७१) अकोलेच्या दिशेने येत होते. यावेळी ओतूर गावच्या हद्दीत (ता. जुन्नर, जि. पुणे) आल्यानंतर एका वळणाच्या ठिकाणी त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. याचवेळी त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या एका कारवर जाऊन आदळली. संजय रखमा भांगरे आणि धनराज सुनील भांगरे यांचा जागीच मृत्यू झाला. या तिघांनाही तातडीने ओतूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. कृष्णा गोडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Two people were killed in a car-bicycle accident

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here