Home संगमनेर संगमनेर: पीएफआय इस्लामी संघटनेत कार्यरत असलेले दोघे पोलिसांच्या ताब्यात

संगमनेर: पीएफआय इस्लामी संघटनेत कार्यरत असलेले दोघे पोलिसांच्या ताब्यात

Sangamner: संगमनेरमधून सदस्य असलेल्या मौलानाला ताब्यात(Arrested) घेण्यात आले.

Two people working in PFI Islami organization are Arrested

अहमदनगर:  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या इस्लामी संघटनेत कार्यरत असलेल्या नगर जिल्ह्यातील दोघांना आज मंगळवारी पहाटे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. नगर शहर आणि संगमनेरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

नगर शहरातील कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, भिंगार कॅम्प व तोफखाना पोलिसांनी केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मागील आठवड्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह ११ राज्यांमध्ये धाडसत्र सुरू केले आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालये व सदस्यांवर धाडी टाकल्या. विविध राज्यातून १०६ लोकांना अटक केली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक कार्यकत्यांना अटक झाली आहे.

नगर शहरातून संघटनेशी निगडित असलेल्या जुबेर आणि संगमनेरमधून सदस्य असलेल्या मौलानाला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

पीएफआयवर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत.

Web Title: Two people working in PFI Islami organization are Arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here