Home अहमदनगर Coronavirus: शिवसेनच्या या दोन खासदारांना करोनाची लागण

Coronavirus: शिवसेनच्या या दोन खासदारांना करोनाची लागण

Two Shiv Sena MPs are infected with Coronavirus

अहमदनगर | Coronavirus: शिर्डी मतदार संघाचे शिवसनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना करोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर येथील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना देखील करोनाची लागण झालेली आहे.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगा यांनाही करोनाचे संक्रमण झाले आहे. खासदार लोखंडे यांच्या वाहन चालकास शारीरिक त्रास जाणवू लागल्याने करोनाची चाचणी केली असता तो करोना पॉझिटिव्ह आल्याने त्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी आपल्या कुटुंबाची चाचणी केली असता त्यावेळी सदाशिव लोखंडे, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा त्याच बरोबर सदाशिव लोखंडे यांच्या संपर्कातील आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या सदाशिव लोखंडे यांच्यावर प्राथमिक उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला आणण्यात येत आहे.

दरम्यान कोल्हापूर शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील आणखी दोघांना करोनाचे संक्रमण झाले आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

See: latest Marathi News

Website Title: Two Shiv Sena MPs are infected with Coronavirus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here