Home जळगाव विजेचा शॉक लागून दोन वायरमनचा मृत्यू

विजेचा शॉक लागून दोन वायरमनचा मृत्यू

शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप, तारेला हात लावताच गणेश यांना शॉक लागला (electric Shock) आणि ते जागीच ठार झाले.

Two wiremen die due to electric shock

जळगाव: विजेचा शॉक लागून वीज वितरणच्या दोन वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना फत्तेपूर (ता. जामनेर) येथे सोमवारी (दि. २४) सकाळी १० वाजता घडली.

गणेश प्रकाश नेमाडे (४५, रा. कन्हाळा, ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (४०, रा. टाकळी पिंप्री, ता. जामनेर) अशी मृत वायरमनची नावे आहेत. फत्तेपूर गावानजीक एका शेतात खांबावरील तार खाली पडल्याचा निरोप आल्याने गणेश आणि झिरो वायरमन सुनील हे तिथे पोहोचले. या तारेला हात लावताच गणेश यांना शॉक लागला आणि ते जागीच ठार झाले, तर दवाखान्यात नेत असतानाच सुनील यांचा रस्त्यात मृत्यू झाला.

Web Title: Two wiremen die due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here