Home संगमनेर संगमनेर तालुक्यात दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू

संगमनेर तालुक्यात दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Sangamner News: दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून (Drowned) दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना.

Two women drowned in Sangamner Taluka

संगमनेर: तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जवळे कडलग व पेमगिरी येथे या दोन घटना घडल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे पुष्पा उत्तम डुबे (वय ४२ वर्ष, रा. पेमगिरी) या महिलेचा शेततळ्यातील पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. डुबे शेततळ्यात पडल्याचे लक्षात येतात त्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात संदीप सोमनाथ डुंबरे (रा. पेमगिरी) यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग या गावात घडली. ज्योती संतोष पाटेकर (वय ३८ वर्षे, रा. आरेवाडी, ता. कराड) असे पाण्यात पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ज्योती पाटेकर यांचा मृतदेह शशिकांत प्रभू हांडे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. विहिरीतून वर काढत उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी शशिकांत हांडे यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Two women drowned in Sangamner Taluka

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here