Home नागपूर प्रेमाच्या जाळ्यात ओढत लॉजमध्ये नेऊन पावणे दोन वर्ष अत्याचार

प्रेमाच्या जाळ्यात ओढत लॉजमध्ये नेऊन पावणे दोन वर्ष अत्याचार

Breaking News | Crime:  प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल पावणे दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक.

Two years of abused, being dragged to the lodge in the net of love

नागपुर: ओळखीतून झालेली मैत्री आणि त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका अल्पवयीन मुलीवर पावणेदोन वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

9 वर्षीय आर्यन दिनेश भगत असे आरोपीचे नाव असून तो गणेशपेठ येथील रहिवासी आहे.  हा प्रकार ज्यावेळी सुरू झाला तेव्हा तो देखील अल्पवयीनच होता. तर अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी मुलगी ही केवळ साडे चौदा वर्षांची होती. प्रेमाच्या  जाळ्यात ओढत तरुणाने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला. मात्र ज्यावेळी लग्नाची विचारणा केली असता त्याने या प्रकरणातून आपला पळ काढला. त्यानंतर प्रेमात आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच पीडित मुलीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आर्यन आणि पीडित मुलीची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर आर्यनने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यासाठी  पीडित मुलीला लग्नाचे देखील वचन दिले. नात्यात विश्वास निर्माण झाल्याचे बघता आर्यनने अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार असे प्रकार केले. ज्यामध्ये अगदी नातेवाइकाच्या घरी नेऊन देखील त्याने अत्याचार केला. 11 मार्च 2022 ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. मात्र, लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. पीडित मुलीला आपली फसवणूक झाली असल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने तिला घेऊन थेट अंबाझरी पोलीस ठाणे गाठले आणि आर्यन विरोधात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

Web Title: Two years of abused, being dragged to the lodge in the net of love

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here