Home अहमदनगर धक्कादायक! मुलांना विष पाजून पत्नीला दिला गळफास, स्वतःही केली आत्महत्या

धक्कादायक! मुलांना विष पाजून पत्नीला दिला गळफास, स्वतःही केली आत्महत्या

Breaking News | Ahmednagar:  सासुरवाडीला निघालेल्या व्यक्तीने रस्त्यात दोन्ही मुलांना विषारी पदार्थ पाजून पत्नीसह गळफास(Suicide) घेतला. विषारी पदार्थ पाजत असताना मुलीने पळ काढल्याने ती बचावली असून पती – पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला.

poisoned his children and hanged his wife, committed suicide himself

अहमदनगर: कुटुंबाला घेऊन श्रीरामपूर येथे सासुरवाडीला निघालेल्या व्यक्तीने रस्त्यात दोन्ही मुलांना विषारी पदार्थ पाजून पत्नीसह गळफास घेतला. विषारी पदार्थ पाजत असताना मुलीने पळ काढल्याने ती बचावली असून पती – पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. पारनेर तालुक्यातील वारणवाडी शिवारात काल शुक्रवारी (दि.५) दुपारी ही घटना घडली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या दुर्दैवी घटनेत गजानन भगवान रोकडे, पत्नी पौर्णिमा गजानन रोकडे व सहा वर्षांचा मुलगा दुर्गेश यांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ वर्षाची मुलगी चैताली बचावली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.

रोकडे कुटुंब तालुक्यातील उदापूर येथील असून ते काल, शुक्रवारी रामज्ञ तालुक्यातील तालुक्यातील चारगाडी शिवारात येताच गजानन व पत्नी यांच्यात वाद झाले. या वादातून गजाननाच्याकडे असलेला विषारी पदार्थ त्याने दोन्ही मुलांना पाजला. त्यादरम्यान मुलगी चैतालीने तेथून पळ काढला, गजानन याने पोटच्या सहा वर्षाचा मुलगा दुर्गेश माला जवळ असलेल्या पाण्यात फेकले व नंतर पत्नी पौर्णिमा हिला गळफास देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

 मुलगी बचावली असल्याने या घटनेचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताब पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: poisoned his children and hanged his wife, committed suicide himself

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here