Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! आणखी दोन दिवस ‘अवकाळी’चे संकट शेतकऱ्यांत चिंता

अहमदनगर ब्रेकिंग! आणखी दोन दिवस ‘अवकाळी’चे संकट शेतकऱ्यांत चिंता

Breaking News | Rain Update: नगर शहर, उपनगरे तसेच मोरवाडीत मध्यम पावसाची हजेरी.

Farmers are worried about the crisis of 'Avakali' Rain for two more days

अहमदनगर: यंदा राज्यात म्हणावी तशा थंडीला सरुवात झाली नाही. त्यातच आता पुढील तीन दिवस जळगाव, नाशिक, अहमदनगरसह अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नगर शहर व उपनगरांमध्ये काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तसेच मोरवाडी परिसरात हलकासा पाऊस झाला. जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाने हजेरी लावली.

सध्या मध्य भारतावर दोन विविध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव होत आहे. हरियाणाच्यावर पश्चिमी प्रकोप प्रणाली आहे. हवेच्या वरच्या थरात ही प्रणाली चक्रीय वात स्थिती रूपात आहे, यासोबतच उत्तर प्रदेशाच्या नैऋत्येला चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या अंतभांगापासून उत्तर प्रदेशातील या चक्रीय स्थितीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडून येणारा वारा हा सोबत आर्द्रता घेऊन येत आहे. या प्रभावातून मध्य भारतावर पावसाळी बातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवार ते रविवार या कालावधीत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे नोव्हेंबरच्या अवकाळीने शेतकयांच्या डोळयात पाणी आणले आहे.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नाशिकमध्ये द्राक्ष, फांद्यासह इतर रिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पिके उद्ध्‌वस्त झाल्याने शेतकयांच्या डोळ्यात पाणी आहे.

Web Title: Farmers are worried about the crisis of ‘Avakali’ Rain for two more days

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here