Home अहमदनगर अहमदनगर: रिकामटेकड्या दोन तरुणांनी लष्करी जीवंत बॉम्ब घरी आणला अन त्यानंतर…

अहमदनगर: रिकामटेकड्या दोन तरुणांनी लष्करी जीवंत बॉम्ब घरी आणला अन त्यानंतर…

Two young men from Rikamate brought home a live military bomb 

Ahmednagar | अहमदनगर: रिकामटेकड्या दोन तरुणांनी केलेला उद्योग त्यांच्याच अंगलट आल्याची घटना घडली आहे.  या उद्योगामुळे लष्करासह पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला. त्यातील एकास ताब्यात घेऊन दोघांविरोधात लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढवळपुरी (ता. पारनेर) येथील अमित संतोष गोंधळे आणि जयराम चौधरी या दोघांनी गावाशेजारी असलेल्या के. के. रेंज या लष्कराच्या रणगाडा प्रशिक्षण केंद्राच्या हद्दीत फिरायला गेले होते. यावेळी या प्रशिक्षण केंद्रात रणगाड्यातून मिस फायर झालेला एक जीवंत बॉम्ब (Bomb) पडलेला होता. या दोघांनी हा बॉम्ब उचलून घराकडे घेऊन आले. बॉम्ब कोठे ठेवायचा, असा त्यांच्यासमोर प्रश्‍न पडला असता त्यांनी शेतामध्ये खोल खड्डा खोदून हा बॉम्ब पुरून ठेवला. हा प्रकार गावातील काही ग्रामस्थांनी हे पाहिला.

याबाबत काही जागरूक ग्रामस्थांनी ही माहिती पारनेर पोलिसांना दिली. पारनेर पोलिसांनी या प्रकरणाची खात्री करून लष्करी अधिकाऱ्यांना माहिती दिली. लष्करी अधिकारी, बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचे संयुक्‍त पथक ढवळपुरी गावात दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने संबंधित शेतात जाऊन अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने बॉम्बचा शोध घेतला. तो जीवंत बोंब जिवंत असल्याचे समोर आले. त्यांनी हा बॉम्ब नष्ट केला. लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी अमित संतोष गोंधळे आणि जयराम चौधरी या दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गांगर्डे अधिक तपास तपास करीत आहेत.

Web Title: Two young men from Rikamate brought home a live military bomb 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here