Home अहमदनगर अहमदनगर: मुकादम पिता पुत्रांचा ऊस तोडणाऱ्या माय लेकीवर अत्याचार

अहमदनगर: मुकादम पिता पुत्रांचा ऊस तोडणाऱ्या माय लेकीवर अत्याचार

Ahmednagar Mukadam father sexual abuse my son Leki who cuts sugarcane

Ahmednagar | Nevase | नेवासे: ऊसतोड करणाऱ्या माय-लेकीवर मुकादम पिता-पुत्रांनी अत्याचार (sexual abuse) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवून पोलिस ठाणे ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे पीडितांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना नेवासे तालुक्यात घडल्याने शिवून पोलिसांनी गुन्हा नेवासे पोलिसांकडे वर्ग केला. वडजी (ता. वैजापूर) येथून मुकादम जिब्राइल शेख, त्याचा मुलगा अन्वर शेख व शहनाज जिब्राईल शेख या तिघांना अटक केली आहे.

वडजी ता. वैजापूर येथील जिब्राइल बाबू शेख हा ऊसतोडणीसाठी साखर कारखान्यांना मजूर पुरविण्याचे काम करतो. तो मजूर शोधण्यासाठी नांदगाव (जि. नाशिक) येथील एका कुटुंबाला भेटला. त्याने मजुरीपोटी या कुटुंबास २०१८ मध्ये १ लाख २० हजार रुपयांची उचल दिली. नेवासे तालुक्यात ऊसतोडणीचे काम सुरू असताना जिब्राइलचा मुलगा अन्वर याने मजुराच्या कुटुंबातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexual abuse) केला. ही घटना मुलीच्या आईला समजल्यावर तिने जिब्राइलकडे तक्रार केली. त्याने मुलीच्या आईस शिवीगाळ करत तिला दमदाटी करत तिच्यावर शारीरिक अत्याचार (Sexual abusing) केला. सातत्याने सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुलगी गर्भवती राहिली. तिचा वैजापूरला गर्भपात करण्यात आला

sसदर प्रकार पीडित महिलेने नांदगाव येथील बहिणीला सांगितला. बहिणीने आधार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अॅड. विद्या कसबे यांना याबाबत माहिती सांगितली. अॅड. कसबे यांनी येवल्यातील सीमा आरोळे, कॅथलिन जोगराव व पुण्यातील सहकारी संस्थेतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलिस ठाणे गाठले. तेथे पीडितेच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि.३१) रात्री उशिरा तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून  हा गुन्हा नेवासे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Mukadam father sexual abuse my son Leki who cuts sugarcane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here