Wines: अकोले खटपट नाका बालाजी वाईन्स दुकानाला ठोकले टाळे
Akole | अकोले: अकोलेतील खटपटनाका येथील परवानाधारक बालाजी वाईन्स (Wines) दुकानावर बनावट मद्य तयार करून विक्री करण्याच्या कारणावरून कारवाई करत अखेर जिल्हाधिकार्यानी टाळे ठोकण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवार पासून हे दुकान बंद करण्यात आले आहे. या कारवाईने सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जात आहे.
या गुन्ह्यात चार परप्रांतीय आरोपीस अटक केल्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमरे तपासून व्यवस्थापकासह मालाकावरही गुन्हे दाखल करून अटक करावी. या दुकानाचा परवाना यापुढे सुरु होणार नाही. यासाठी योग्य पाठपुरावा करून तो कायमस्वरूपी रद्द करावा अशी जनतेतून मागणी होत आहे.
अकोल्यात बालाजी वाईन्स या शासनमान्य परवानाधारक विदेशी दारू दुकानावर ३० मार्च रोजी मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून विविध नामांकित कंपन्यांची बनावट दारू बनविण्याच्या साहित्यासह चार परप्रांतीय आरोपींना अटक केल्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली. यामुळे सर्वपक्षीयांनी व संघटना यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला. व परवाना रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
Web Title: Closed door of Akole Khatpat Naka Balaji Wines