Home अकोले अकोले ब्रेकिंग!  प्रवरा नदीपात्रात दोन तरुण बुडाले

अकोले ब्रेकिंग!  प्रवरा नदीपात्रात दोन तरुण बुडाले

Breaking News | Akole: प्रवरा नदीपात्रात दोन तरुण बुडाले एकाचा मृतदेह पाण्यातून काढला तर दुसऱ्याचा शोध सुरु.

Two youths drowned in Pravara river bed

अकोले:  अकोले तालुक्यातील सुगाव येथील रोपवाटीकेजवळील प्रवरा नदीपात्रात दोन तरुण बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. काल बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अकोले तालुक्यातील सुगाव येथे हे तरुण मुरघास बनविण्यासाठीधुमाळ वस्तीवर आले होते. उष्णतेमुळे सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे प्रवरा पात्रातील पाझर तलावाजवळ अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाझर तलावाच्या पडणाऱ्या पाण्याच्या दाबाचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यापैकी सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला असून अकोले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे तर अर्जुन याचा शोध चालू असून स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.

अर्जुनचा शोध लागत नसल्याने प्रांताधिकाऱ्यांनी कळस येथून पट्टीचे पोहणाऱ्यांना पाचरण करून अर्जुन याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. यावेळी अकोले पोलिस स्टेशनचे कर्मचारी, कामगार तलाठी, पोलीस पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Web Title: Two youths drowned in Pravara river bed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here