Home संगमनेर संगमनेर तालुक्यात सापडला तरूणाचा मृतदेह

संगमनेर तालुक्यात सापडला तरूणाचा मृतदेह

Breaking News | Sangamner: येथील पाटालगत एका अज्ञात तरूणाचा मृतदेह.

body of the youth was found in Sangamner taluka

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील येथील पाटालगत एका अज्ञात तरूणाचा मृतदेह आज बुधवारी सकाळी आढळून आला होता.

या मृतदेहाच्या तोंडावर मोठ्या जखमा आढळून आल्याने हा घातपात होता किंवा अपघात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मृतदेहाबाबत अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह शिबलापूर येथील संतोष बबन मुन्तोडे (वय २१) या तरूणाचा असून त्याचा मृत्यू पाटात पडून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत अधिक तपास आश्वी पोलीस करीत आहेत.

Web Title: body of the youth was found in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here