Home अहमदनगर अहमदनगर: गोदावरी कालव्यात पडून मुलाचा बुडून मृत्यू

अहमदनगर: गोदावरी कालव्यात पडून मुलाचा बुडून मृत्यू

Breaking News | Ahmednagar: तरुण मुलाचा गोदावरी कालव्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू. (Death)

Boy drowned after falling into Godavari canal

नांदुर्खी : शिर्डी साकुरी शिवाला राहत असलेल्या शैलेश देविदास सोळसे या तरुण मुलाचा गोदावरी कालव्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शैलेश २० मे २०२४ दुपारी ३ वाजता गोदावरी कालव्यात पोहण्यासाठी आला. त्याने कालव्यात पोहण्यासाठी उडी घेतली असता तो पाण्यातून वरच आला नाही. त्याचे आई, वडील, भाऊ नातेवाईक यांनी सगळीकडे शोधाशोध केली. त्याचा कुठेच तपास लागला नाही. दुसऱ्या सकाळी दिवशी गोदावरी कालव्याच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी महिला गेल्या असता त्यांना लोखंडी खांबाला अडकलेला पाण्यात सदर मुलाचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर हा मृतदेह कोणाचा अशी चर्चा झाल्याने शैलेशच्या आई- वडिलांनाही या घटनेची माहिती मिळाली. शैलेशचे आई-वडील घटनास्थळी येऊन हा मुलगा आपलाच असल्याचे सांगून या मुलाचा आम्ही कालपासून शोध घेत असल्याचे सांगून घटनास्थळी आक्रोश केला. या घटनेची माहिती पोलीस पाटील सोमनाथ वाणी यांना देण्यात आली. त्यांनी शिर्डी पोलिसांना माहिती दिली.

 शिर्डी पोलिसांनी सदर घटनेचा गुन्हा नोंदविला असून सदर घटनेमागील काय कारण आहे याचा ते शोध घेत आहेत. शैलेशच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Boy drowned after falling into Godavari canal

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here